Hot Posts

6/recent/ticker-posts

भारतीय स्त्रियांचे उधारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जागतिक महिला दिनाच्या तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!

8 मार्च जागतिक महिला दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो जगभरात महिला अधिकारासाठी महिलांनी विविध आंदोलने केलेली आहेत परंतु भारतामध्ये महिला अधिकारासाठी लढणाऱ्या या महिला नसून एक पुरुष आहे ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर.

युरोपमध्ये 1950 च्या दशकांमध्ये महिला आंदोलनाला सुरुवात झाली भारतामध्ये त्या अगोदर महिला शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले फातिमा शेख यांनी आंदोलन चालू केले होते, महात्मा ज्योतिराव फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे मुलींची पहिली शाळा 1848 काडून तिथे सावित्रीबाई फुले फातिमा शेख यांनी मुलींना निशुल्क शिक्षण देत महिला सक्षमीकर्णाची चळवळ सुरू केली.




परंतु ज्याप्रकारे इथल्या सवर्ण स्वतःला उच्च वर्णीय समजत असलेल्या लोकांकडून महिलांकडे महिला ही उपभोग करण्याची वस्तू म्हणूनच पाहिलं जातं होतं, चूल आणि मूल या दृष्टीकोनातून द्वेष आणि तुच्छतेने पहिलं जात होतं शूद्रांच्या खालोखाल महिलांना देखील व्यवस्थेने माणूस म्हणून जगण्याचे हक्क आणि अधिकार नाकारले होते अश्या भारतीय महिलांना सन्मानाने जगता आलं पाहिजे यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलित महिलांनाच नाही तर तमाम भारतीय महिलांसाठी हिंदू कोड बिल लिहिले.

जगभरामध्ये महिला समस्या सारख्याच आहेत परंतु जाती समस्या भारतामध्येच आहे, आणि जातीव्यवस्थे मध्येच महिलांचे शोषण आहे. भारतीय समाज समाजव्यवस्था, पितृसत्ताक आहे यामध्ये पुरुषांना प्रथम प्राधान्य दिले जाते मुलींना महिलांना नीच समजले जाते,हिंदू धार्मिक ग्रंथ कथांमध्ये तर मुलींना बोज समजले गेले आहे,त्या इथल्या व्यवस्थेला उलटून टाकत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 11 एप्रिल 1947 रोजी सभागृहात हिंदू कोड बिल मांडले.

हिंदू कोड बिलामध्ये स्त्रियांच्या हिताच्या सर्व बाबींची तरतूद आहे, त्यातील काही महत्त्वाच्या बाबी आहेत लग्नातील किंवा दत्तक घेण्याच्या बाबतीत जातीभेदाचे बंधन नसावे हे मुख्य तत्त्व मांडले होते, त्याचा अर्थ असा नव्हे की जबरदस्तीने आंतरजातीय विवाह व्हावे किंवा दत्तक घ्यावे एकमेकांवरील प्रेमामुळे जर कोणाला आंतरजातीय विवाह करायचा झाला किंवा इतर जातीतील मुलगा दत्तक घेण्याचे ठरले तर मनूस्मृतीमुळे तशी बंदी होती.

परंतु या बीलाने ती बंदी काढून टाकली होती, नवरा कितीही वाईट असला कितीही वाईट वागत असता तरी जुन्या धर्मशास्त्रानुसार त्याला सोडून देण्याची परवानगी नव्हती, परंतु ज्या स्त्रीला वाटेल मला याच्याशी संसार करायचा नाही घटस्पोट करायचा आहे ही मुभा या हिंदू कोडबीलाने तमाम महिलांना दिली होती. त्याच प्रमाणे पती मेल्यानंतर त्याच्या संपत्तीची मालकी त्या स्त्रीला दिली जात नव्हती ती पतीची संपूर्ण संपत्तीची मालकी त्या स्त्रीकडे देण्यात आली होती. त्याचबरोबर वडील मेल्यावर फक्त मुलंच ती संपत्ती वाटून घेत असत तसे न करता मुलीला देखील तिचा हिस्सा वाटा दिला पाहिजे असे भारताच्या इतिहासात सर्वप्रथम हिंदू कोड बिलाच्या रूपाने महिला सक्षमीकरणाची मेड डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रोवली.

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 5 फेब्रुवारी 1951 रोजी हे हिंदुकोडबील लोकसभेत मांडण्यात आले होते, परंतु त्यावर कट्टरवाद्यांची सावली पडल्याने त्या बिलाची अगोदरच हत्या झाली होती. त्यावेळी चे राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना सांगितले हे बिल लोकसभेमध्ये जरी पास झाले तरी मी अनुमती देणार नाही.आणि पंतप्रधानांनी इथल्या कट्टरवाद्यांच्या दबावाला बळी पडून हे बिल पास करण्यास उत्सुकता दाखवली नाही.

येथे एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की, ज्या क्षणी हे हिंदुकोडबील नाकारण्यात आले त्या क्षणी बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिलाविषयी बोलताना ते म्हणाले की समाजातील स्त्री-पुरुष यांच्यातील असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन आर्थिक समस्यांशी निगडीत कायदे संबंध करीत जाणे म्हणजे भारताच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगाऱ्या वरती राजमहल बांधण्या सारखे होय.




त्यानंतर पुढे 1955_56 मध्ये नेहरूंनी हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार कायदे वेगवेगळ्या वेळी मंजूर केले ते खालील प्रमाणे

1)हिंदू वारसा हक्क कायदा

2)हिंदू विवाह कायदा

3) हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा

4)हिंदू दत्तक व पोटगी कायदा अशाप्रकारे चार कायदे करण्यात आले.

परंतु भारतीय महिलांचे शोषण हे पितृसत्ताक व्यवस्थेने केले आहे. भारतासारख्या देशांमध्ये एखाद्या मुलीवर बलात्कार झाला नंतर ती मुलगी न्याय मागत कोर्टामध्ये जात असते जेव्हा तिला जज विचारतो बलात्कार ज्याने केला आहे त्याच्याशी लग्न करते का? ही बाब अतिशय लाजिरवाणी आहे.जर तुम्हाला खरंच महिलांना न्याय द्यायचा असेल तर बाबासाहेबांची दूरदृष्टी अंमलात आणावी लागेल. तुम्ही आजही ज्या प्रकारे विधवा महिलेकडे वाईट नजरेने पाहता ते सोडून देऊन तुम्ही तुमच्या घरात तिचा स्वीकार करून आदरानं वागवलं पाहिजे.

आंतरजातीय प्रेम करणाऱ्यांच्या विरोधात उभे न राहता तुम्ही जर त्यांच्या समर्थनात उभे असाल तर तुम्ही खर्या अर्थाने महिला सक्षमीकरणाच्या रस्त्यावर चालत आहात असे समजता येईल. परंतु इथे तुमची उच्चवर्णीय जात आडवी येते. आणि तुम्ही आजही विरोधच करता म्हणून जोपर्यंत देशात पितृसत्ताक व्यवस्था आहे तोपर्यंत भारतीय महिलांचे शोषण होतच राहील असेच म्हणावे लागेल.

ज्या महिलांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना न वाचता न समजून घेता नाकतोंड वाकडे केले त्यांना मी एवढेच बोलेन की महिलांना प्रस्तुतिय रजा, कामाच्या 12 तासाच्या 8 तास पुरुषाच्या बरोबरीने समान संधी,शासकीय नोकरी मध्ये महिलांना आरक्षण,राजकारणा मध्ये महिला आरक्षण,कुठलाही निर्णय घेण्याचे स्वतंत्र महिलांना दिल्यामुळेच आज आद इंदिरा गांधी सारखी महिला पंतप्रधान पदावर आरूढ होऊ शकली तसेच आद प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदापर्यंत पोहचू शकल्या तर कित्येक महिला आज खासदार,आमदार, राज्यपाल, विमान,रेल्वे, अश्या अनेक पदांवर अरुंड होऊ शकल्या हे बाबासाहेबांचे योगदान नव्हे ? खऱ्या अर्थाने तुमच्या उद्धारकर्ते दुसरे तिसरे कोणीही नसून एकमेव डॉ बाबासाहेब आंबेडकरच आहेत.

म्हणूनच स्वतंत्र भारतातील स्रियांचे उधारकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत याला इतिहासात तोड नाही.
मो 9527464729
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे पत्रकारिता करत आहेत.

Post a Comment

0 Comments