Wednesday, July 14, 2021

मी ब्राम्हण समाजातील महिला एकता जोशी...

 एकता जोशी या ताईचा हा लेख वाचा. तुम्हांला सत्य काय हे माहीत पडेल आणि तुमच्या मनातील शंका दूर होईल. या ताईचे मनःपूर्वक अभिनंदन

खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

🙏🙏🙏


आम्हांला हे माहीत आहे की जगात देव वगैरे काही नाही. पण आम्ही सतत लोकांना देवदेव करायला सांगतो, कारण त्याने आमचे पोट भरते.

खर सांगून दमडीही कुणी देत नाही. खोटं सांगून हजारो रुपये मिळतात.

पूजा, पाठ, अभिषेक, आशीर्वाद, वरदान, हस्त, पुण्य, मोक्ष हे सर्व निखालस खोटे आहे, वर स्वर्गही नाही आणि नरकही नाही.

काल्पनिक नरक आम्हीच निर्माण केला लोकांना भीती दाखवण्यासाठी.

आम्हीच नवीन पंथाची, नवनवीन पूजांची निर्मिती करतो. लोकांनाही नवीन पाहिजे असते.

खर सांगू भारतात इतके मूर्ख लोक आहेत की जगात कुठेही नाहीत. आम्ही जे सांगू ते पटकन् मानतात, थोडीही चिकित्सा करत नाहीत, चौकशी करत नाही.

आम्ही ब्राह्मण कधीही वारीत जात नाही. आम्हांला माहीत आहे वारीत जाऊन नसलेल्या देवाचे दर्शन घ्यायचे. देव दर्शनाने कधीच काही होत नाही.

जोपर्यंत वेडे लोक हिंदू धर्मात आहेत, तोपर्यंत आमचा धंदा चालणार व आम्ही चालवणार.

फुकटचा पैसा मिळतो. माझे आजोबा माझ्यापेक्षा जास्त पैसे घरी आणतात.

मी वकील असूनही कमी पैसे कमावते. अंघोळ करणे संध्यापाठ करणे, सोवळे हे फक्त आमचे महत्त्व वाढविण्यासाठी असते.

आम्हांला दान सर्व थरांतील लोकांचे चालते. मग तो अस्पृश्य असो वा इतर धर्माचा असो. काहीच फरक पडत नाही.

आरत्या, पंचारत्या गणपती, दुर्गा हे सर्वकाही खोटे आहे. साधा विचार लोक करत नाहीत.

आपणच गणपतीला वाजतगाजत आणतो आणि वाजतगाजत पाण्यात बुडवतो. काय हे?

पण लोक एवढे अंध झाले आहेत की अजून शंभर वर्षे तरी सुधारणार नाहीत.

आमचा धंदा चालणार. आम्हांला काहीच करायची गरज नाही. कारण सर्व जातीच्या महिला आमच्या ताब्यात आहेत. त्या नवऱ्याचे ऐकत नाहीत, पण आमचे ऐकतात...

आम्ही सांगितलेली कोणतीही पूजा त्या करतातच. आम्ही प्रत्येकाच्या डोक्यात देव घातलेला आहे तो कधीच बाहेर निघणार नाही आणि आमची दुकानदारी चालतच राहणार.

बरेच देव न मानणारे अलिकडै रात्रंदिवस बोंबलत आहेत. पण त्यांचे त्यांच्या घरातील लोकसुद्धा ऐकत नाहीत.

आम्ही देवाच्या कहाण्या टिव्हीद्वारे पुस्तकाद्वारे चॅनेलद्वारे कार्यक्रमांद्वारे सतत लोकांना... विशेषतः बायकांना ऐकवत असतो व त्यांच्या डोक्यात देव घालत असतो.

अहो, संगणकाची पूजा करतात यावरून किती आंधळे लोक आहेत या देशाचे हे समजते.

मी ब्राह्मण आहे. ब्राह्मणचा अर्थ आहे कुणालाही ब्र बोलू द्यायचे नाही, फक्त आपलेच म्हणणे ऐकवायचे, म्हणजेच ब्राह्मण...!

नास्तिक लोकांचे देव नाहीत हे १००% खरे आहे, पण त्यांचे ऐकतो कोण! त्यांची बायकोसुद्धा ऐकत नाही.

खरेतर आम्हांला धर्माचे, देवाचे काही देणेघेणे नाही. आम्हांला काबाडकष्ट, मेहनती काम करायचे नव्हते. हिंदू धर्मात अनेक वेडे आहेत, त्यांच्यामुळे आम्हांला फुकटचे खायला मिळते.

आम्ही हिंदू लोकांना आतापर्यंत गेल्या पाच हजार वर्षांपासून मूर्ख बनवत आलो आहोत, अजूनही बनविणे चालू आहे.

कितीही शिकले तरी यांची चौकस बुद्धी जागृत झाली नाही.

आमचा अडथळा इंग्रज होते. ते हिंदूना शिक्षण देऊन जागृत करू लागले होते. पण आम्ही त्यांना पिटाळून लावले व आमचे राज्य आणले.

त्या आंबेडकरानी थोडा प्राॅब्लेम केला होता. त्यांना आम्ही धर्मातून काढले. झाले काम!

हे हिंदू रोज देव देव करणार! आम्ही ३% आहोत,९७% हिंदूनी रोज एक रुपया जरी देवासाठी खर्च केला, तरी आमच्याइतके श्रीमंत जगात कुणीही नाही.

किती मूर्ख लोक आहेत, आमच्या पाया पडून दक्षिणा देतात.

आम्ही नेहमीच म्हणतो देव सगळीकडे आहे. ते खरेच आहे.

गेली ७० वर्षे आमचीच सत्ता आहे. काँग्रेस आमचीच आहे.. भाजप आमचाच आहे.. शिवसेना आमचीच आहे.. कम्युनिस्ट आमचेच आहेत.. आम्ही भांडायचे नाटके करत असतो. आम्हांला जगावर राज्य करायचे आहे.

आम्ही समोरासमोर कधीच भांडत नाही. आम्ही आतून पोखरतो व खतम् करतो आणि पोखरणारे हात तुमचेच वापरतो.

आम्ही सगळीकडे आहोत आणि राहू.

परत मी "ब्राम्हण" असून ठासून सांगते, देव नाहीच. पण तुम्ही मानणार नाही. आता तुम्हीच ठरवा.

आम्हांला कुणी शिविगाळ केली की हेच SC, ST, OBC, VJNT, मराठा लोक आपापसात भिडतात, एकमेकांचे खून करायला मागेपुढे पाहत नाहीत. हेच आमचे बिनपगारी पोलीस आहेत.

देव, देऊळ आणि धर्म आमचा हजारो वर्षांपासूनचा एकमेव अजेंडा आहे.

ही पोस्ट आता जो वाचत आहे त्याचेही डोकं ठणकलं असेल, तर तो आमचा सच्चा बिनपगारी पोलीस आहे आणि ह्या अशा आमच्या भक्तांमुळे आम्ही हजारो वर्षे ह्या देशावर राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, प्रचार प्रसार, औद्योगिक, न्यायविषयक सत्ता भोगत राहू.


🖋 एकता जोशी

बंगला नं ८५, रेशीम बाग, नागपूर

Tuesday, July 13, 2021

बौद्ध धम्मातील खास वैशिष्ट्ये "


१) बौद्ध धम्माचे पहिले वैशिष्ट्य बौद्ध धम्मात माणसाला केंद्रबिंदू मानले आहे. भगवान बुद्धाने नेहमी मानवाच्या कल्याणाचा विचार सांगितला आहे.
२) बौद्ध धम्माचे दुसरे वैशिष्ट्य भगवान बुद्धांनी देव नाकारला आहे. भगवान बुद्ध म्हणतात तुमचे भले करणारे किंवा वाईट करणारी देव नावाची कोणती शक्ती नाही.
३) बौद्ध धम्मातील तिसरे वैशिष्ट बौद्ध धम्मात देव नसल्यामुळे आरती, प्रार्थना, आराधना नाही. कोणतेही कर्मकांड नाही. बौद्ध धम्मात वंदना आहे आणि वंदना ही निर्मळ जीवन जगण्याची प्रतिज्ञा आहे.
४) बौद्ध धर्माचे चौथे वैशिष्ट भगवान बुद्धाने देवाबरोबर स्वर्ग नाकारला आहे. स्वर्ग हे विज्ञानावर टिकत नाही किंवा त्याचे अस्तित्व आतापर्यंत कोणालाही वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता आलेले नाही.
५) बौद्ध धम्मातील पाच वैशिष्ट्य बौद्ध धम्मात जातीयता नाही. भगवान बुद्धांनी स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव केला नाही.
६) बौद्ध धम्माचे सहावे वैशिष्ट बौद्ध धम्मात आत्मा नाकारला आहे. आत्म्यावर विश्वास नाही हा अनात्मवाद आहे.
७) बौद्ध धम्माचे सातवे वैशिष्ट बौद्ध धम्मात पुनर्जन्म नाही. भगवान बुद्ध म्हणतात तुम्हाला पुन्हा जन्म नाही, म्हणून या जन्मातच चांगले कर्म करा.
८) बौद्ध धर्माचे आठवे वैशिष्ट बौद्ध धम्माने कर्मकांडाला नाकारले आहे. बौद्ध धम्म सत्यावर आधारित असून व्यक्ति स्वातंत्र्याला पूर्ण वाव आहे.
९) बौद्ध धम्माचे नववे वैशिष्ट बौद्ध धम्मात मोक्षाची संकल्पना नाही भगवान बुद्धाने मोक्ष नाकारला. भगवान बुद्ध म्हणतात मी मोक्षदाता नाही मी मार्गदाता आहे. भगवान बुद्धांनी निर्वाण प्राप्तीचा मार्ग दाखवला आहे.
१०) बौद्ध धम्माचे दहावे वैशिष्ट भगवान बुद्धाचा विचार हा समस्त मानवाच्या सुखाचा मार्ग असल्याने त्यास अनुसरल्याने मानवाचे मंगल होणार आहे.
११) बौद्ध धम्माचे अकरावी वैशिष्ट स्वयं प्रकाशीत व्हा. असा संदेश दिला आहे
१२) बौद्ध धम्माचे बारावे वैशिष्ट्य बौद्ध धम्माने मोक्ष नाकारला आहे. मोक्षप्राप्ती ऐवजी निब्बाण सांगितले आहे.
१३) बौद्ध धम्माचे तेरावे वैशिष्ट्य भगवान बुद्धांचा धम्म माणसाला वैर भावना ठेवू नका, मैत्री भावनेने वागा असे सांगतो.
१४) बौद्ध धम्माचे चौदावे वैशिष्ट्ये बौद्ध धम्म मानवतावादी आहे. बौध्द धम्मा मध्ये दैववाद नाकारला आहे.
१५) बौध्द धम्माचे पंधरावे वैशिष्ट बौध्द धम्म माणसाला भौतिक सुखापेक्षा मानसिक समाधान देतो. कल्पना, स्वर्ग, देव, आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष हे काल्पनिक आहे.
१६) बौध्द धम्माचे सोळावे वैशिष्ट्य बौध्द धम्म शुद्ध कर्म करण्यास सांगतो. वाचेने, मनाने नेहमी शुद्ध कर्म करा.
१७) बौध्द धम्माचे सतरावे वैशिष्ट्ये बौद्ध धर्म माणसाला आपले कर्तव्य आणि अकर्तव्य कोणते ते निश्चित समजावून सांगतो. माणसाला चारित्र्य आणि नैतिक मूल्य सांगतो, अचारसहिता ठरवून देतो.
१८) बौध्द धम्माचे अठरावे वैशिष्ट्य बौद्ध धम्म माणसाला जीवनात चांगले नियम, सद्गुण आणि चांगले विचार व चांगला दृष्टिकोन अवगत करण्यास सांगतो.
१९) बौद्ध धम्माचे एकोणिसावे वैशिष्ट्य बौद्ध धम्म म्हणजे माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे, समतेने वागावे, मैत्री भावनेने वागावे.
२०) बौध्द धम्माचे विसावे वैशिष्ट्य बुद्धांनी नेहमी मानवाच्या कल्याणाचा विचार सांगितला आहे. मानवाचे जीवन सुखी व्हावे, मनुष्य कुशल कर्माकडे जावा आणि अकुशल कर्मापासून दुरावा हा हेतू भगवान बुद्धांचा होता.
!जयभीम! !!जयभारत!! !!!नमोबुद्धाय!!!

बुद्धाच्या* मनात प्रत्येकाबद्दल अपार *करुणा* असते.


#बुद्ध कुणाची वाहवा करत नाही,

#बुद्ध कुणाचा अपमानही करत नाही...
पण तो तठस्थपणे *चिकित्सा* मात्र करतो.
#बुद्ध आशीर्वाद देत नाही,
#बुद्ध शाप आणि उ:शापही देत नाही...
पण तो तुम्हाला 'माणूस' म्हणून कसं जगावं हे सांगणारा *पथदर्शक* मात्र होतो.
#बुद्ध मानला तर भिक्षा मागून जगणारा एक भिक्खु आहे...
आणि जाणला तर स्वत:मध्ये एक प्रचंड *विद्वत्ता* आहे, *अद्वितीय तत्वज्ञान* आहे.
#बुध्द अल्प नाही,
#बुद्ध अती ही नाही...
या कमी आणि जास्तच्या मधल्या पुलावरून तो *सहज चालणारा* आहे.
#बुद्ध कधी सूक्ष्म अणु आहे आणि जवळ गेल्यावर *अवकाशासारखा* आहे...
ज्याचा थांग आपल्याला लागत नाही.
#बुद्ध मानला तर धम्माचा संस्थापक आहे, श्रमण आहे, *तथागत सम्यक संबुद्ध* आहे.. त्याचवेळी बालपण, तारुण्य, वृद्धावस्था, आजारपण आणि मृत्यू या सगळ्या मानवी अवस्थांतून गेलेला तूमच्या-माझ्यासारखा *मानव* सुद्धा आहे.
#बुद्ध शाश्वत सत्य आहे आणि इतक्या आघातानंतर सुद्धा न संपणारी *अभेद्य विचारधारा* आहे.
#बुद्ध एका जागी एक महामानव आहे, आणि दुसऱ्या जागी तो तुमचंच *मन* आहे.
एकदा स्वत:ला विचारा यात तुमचा आणि तुम्हाला समजलेला #बुद्ध' कुठे बसतो??
!जयभीम! !!जयभारत!! !!!नमोबुद्धाय!!!

सगळ्याचं हित करा .




♀ एका दिवशी एक व्यक्ती भगवान बुद्धाकडे गेला. तो खूप तणावाखाली होता. त्याच्या डोक्यात अनेक प्रश्नांचे काहूर माजले होते.
♀जसे आत्मा म्हणजे काय?, मृत्यूनंतर माणूस कुठे जातो?, सृष्टीची रचना कोणी केली?, स्वर्ग-नरकाचं सत्य नेमकं काय? आणि ईश्वर आहे की नाही? त्याला या प्रश्नांची उत्तर मिळत नव्हती.
♀जेव्हा तो भगवान बुद्धांकडे पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की, अनेक जण त्यांच्या आसपास बसले आहेत. भगवान बुद्ध त्या सगळ्यांच्या प्रश्नांचे समाधान अत्यंत सहजतेने करत आहेत.
♀खूप वेळ हा उपक्रम सुरू होता. बुद्ध सगळ्यांना संतुष्ट करत होते.
♀त्याने विचार केला की, भगवान बुद्धांना दुनियादारीच्या प्रकरणात पडून काय फायदा आहे? त्यांनी भजन करावे आणि साधारण समस्या असणाऱ्या लोकांना दूर करावे.
♀पण भगवान बुद्धांना पाहून तर असे वाटत होते की, त्या लोकांचे दुःख जणू भगवान बुद्धांचेच दुःख आहे. शेवटी त्या व्यक्तीने प्रश्न विचारलाच की, भगवान तुम्हाला संसाराच्या गोष्टींबाबत काय देणंघेणं?
♀तेव्हा बुद्ध म्हणाले की, मी ज्ञानीच नाही तर मी एक माणूसही आहे. "तसंही ज्ञान काय कामाचं, जेव्हा तो माणूस दुसऱ्यांच्या चिंतेला आपली मानू शकणार नाही. असं ज्ञान तर अज्ञानापेक्षाही वाईट आहे."
बुद्धाचे विचार ऐकून आलेल्या व्यक्तीच्या मनातील शंका कुशंका दूर झाली. त्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला मिळाली .आणि तो भगवान बुद्धांचा उपासक झाला.व त्याला जे ज्ञान भगवान बुद्धांकडून मिळाले ते ज्ञान इतरांना देऊ लागला.
☝️ कथेचं सार हे आहे की, ज्ञान हे तेव्हाच सार्थकी लागतं, जेव्हा ते लोकांच्या कल्याणाशी संलग्न होतं.
!जयभीम! !!जयभारत!! !!!नमोबुद्धाय!!!

*बौध्द धम्माचे अधिष्ठान*


*1) भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी जीवनमार्ग शोधून काढला.*

*2) भगवान बुद्धांनी प्रतिपादन केलेला जीवनमार्ग यालाच बौध्द-धम्म म्हणतात.*
*3) हा जीवनमार्ग तीन बाबींवर अधिष्ठित आहे.-*
*1) अनित्य 2) दुःख 3) अनात्म.*
*4) यापैकी पहिले अधिष्ठान "अनित्य " आहे.भगवान बुध्द म्हणतात,मनुष्यप्राणी आणि प्रत्येक वस्तु ही परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे.आपल्या जीवनाच्या कोणत्याही क्षणी तो तोच असू शकत नाही.*
*5) याचा अर्थ मनुष्यप्राण्याला दुःख असले तरी त्याच्या दुःखाचे परिमार्जन करता येते.दुःख नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हे धम्माचे पाहिले अधिष्ठान आहे.*
*6) दुःख:- यापैकी दुसरे अधिष्ठान " दुःख " आहे.मनुष्यप्राणी दुःखात, दैन्यात, दारिद्र्यात राहत आहे,हे त्याचे दुसरे तत्व होय.*
*7) सर्व जग दुःखाने भरलेले आहे,याचा अर्थ दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हे धम्माचे दुसरे अधिष्ठान आहे.*
*8) अनात्म :- यापैकी तिसरे अधिष्ठान " अनात्म " आहे.भगवान बुध्द म्हणतात की, आपला जो मार्ग आहे त्याचा ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही संबंध नाही.त्याचा मरणोत्तर जीवन व कर्मकांडाशी संबंध नाही.*
*9) माणुस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हाच धम्माचा केंद्रबिंदू आहे.भगवान बुद्धांनी सांगितलेले हे धम्माचे तिसरे अधिष्ठान आहे.*
*10) अश्याप्रकारे भगवान बुद्धांचा धम्म अनित्य,दुःख आणि अनात्म या तीन बाबींवर अधिष्ठित आहे.*
*11) अनित्य म्हणजे जग हे परिवर्तनशील आहे.दुःख म्हणजे प्रपंच दुःखमय आहे आणि अनात्म म्हणजे जगामध्ये " आत्मा " नावाची काही बाब नाही, जग हे कर्मानुसार चालते, अश्या यथार्थ ज्ञानाला ' सम्यक दृष्टी ' असे म्हणतात.एकंदरीत जगातील दुःख आणि त्यापासुन मुक्तता करण्याचा उपाय हा धम्माचा मुख्य पाया आहे.
!जयभीम! !!जयभारत!! !!!नमोबुद्धाय!!!

पंचांग प्रणाम करताना शीर का झुकवतात? वाचा सम्राट अशोकाची कथा...*




▪️एकदा सम्राट अशोक राज्याच्या टेहळणीसाठी निघाला होता. सोबत त्याचा प्रधान आणि मुख्य सैनिक होते.
▪️राज्याचा फेरफटका मारत असताना राज्याच्या वेशीवर एक भिक्खू बसले होते. सम्राट अशोकाने आपल्या वहाणा (चप्पल) बाजूला काढून बाजूला ठेवत भिक्खुंजवळ जाऊन त्यांना पंचांग प्रणाम केले.
▪️भिक्खू काहीच बोलले नाहीत. त्यांनी नुसते स्मित करत आशीर्वादरूपी हात सम्राटाला दर्शवला. त्यांचे दर्शन घेऊन सम्राट अशोका महालात परत आले.
▪️महालात आल्यावर प्रधान सम्राटाला म्हणाला, 'सम्राट, जे शीर राजतिलक लावल्याने शोभून दिसते, ज्या शीरावर विजयाचा मुकुट शोभायमान दिसतो, जे शीर समस्त प्रजाजनांसाठी अभिमानाची बाब आहे, ते शीर एका भिक्खुंसमोर तुम्हाला झुकवावेसे का वाटले.
▪️तुम्ही केवळ हात जोडून अभिवादन केले असते, तरीदेखील भिक्खुंना मान मिळाला असता. परंतु पंचांग प्रणाम हे अतिच होत नाही का? यावर सम्राट काहीच उत्तरले नाहीत. त्यांनी केवळ हसून वेळ मारून नेली.
▪️काही दिवसांनी सम्राटांनी चार पिशव्यांमध्ये नुकतेच मृत पावलेल्या चार प्राण्यांचे शीर कापून प्रधानाला दिले आणि एका पिशवीत मानवाचे खोटे शीर दिले.
▪️सम्राट म्हणाले, या पाचही पिशव्यांमधील शीर विकून रिकाम्या पिशव्या घेऊन ये. प्रधान गोंधळला. परंतु प्रतिप्रश्न विचारायचे त्याचे धाडस होईना. त्याने त्या पिशव्या नेल्या.
▪️त्यातील प्राण्यांचे शीर विकले गेले, परंतु मानवाचे शीर घ्यायचे धाडस कोणीच करेना. प्रधान ते शीर घेऊन परत आला. त्याने सम्राटाला सांगितले, हे शीर घेण्यास कोणीच तयार नाही.
▪️आपल्यावर हत्येचा आळ येईल, शिवाय मानवी शीर घेऊन काय उपयोग, असे म्हणत लोकांनी हे शीर नाकारले आहे, असे प्रधान म्हणाला.
▪️यावर सम्राट अशोक म्हणाले, 'काही दिवसांपूर्वी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले? पंचांग प्रणामाच्या वेळी शीर का झुकवायचे ते कळाले?
▪️कारण, एकमेव मानवी शीर असे आहे, जे अहंकारामुळे कोणापुढे झुकत नाही, वाकत नाही त्यामुळे ते देहापासून विलग झाल्यावर त्याला काही किंमत उरत नाही.
▪️ते देहावर असेपर्यंतच त्याला मान आहे. परंतु, आयुष्यात ज्ञानी, साहसी, अनुभवी लोकांपुढे हे शीर झुकवले तरच आशीर्वादाची प्राप्ती होते. समोरील व्यक्तीचा तो आदरयुक्त सन्मान आहे.
▪️माझ्या मृत्यूपश्चात माझे शीर संग्रही करून ठेवले, तरी त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून ते योग्य वेळी, योग्य ठिकाणी झुकवले गेलेच पाहिजे!
👌 म्हणूनच म्हणतात ना, ज्याचे आचरण शुद्ध, त्याचेच चरण धरा आणि मस्तक नमवता येईल तिथेच नतमस्तक व्हा!
!जयभीम! !!जयभारत!! !!!नमोबुद्धाय!!!

जेष्ठ पौर्णिमा "



जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे . मंगलदायी ठरली आहे.
या पौर्णिमेचे आपण महत्व जाणून घेतले पाहिजे . बौद्ध जगतात या पौर्णिमेला अनन्य
साधरण महत्व आहे. सिद्धार्थ गौतमाला इ.स.पूर्व ५२८ ला वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती
सम्यकसंबोधि प्राप्त होऊन तथागत सम्यक समबुद्ध होतात. आपल्याला मिळालेल्या
ज्ञानाची पुन्हा पुन्हा उजळणी करावी यासाठी चवथ्या आठवड्यात जेष्ठ पौर्णिमेच्या
दिवशी रत्नघर या स्थळी राजायतन या झाडाखाली बसले असता ब्रम्ह देशाचे दोन (२)
व्यापारी तपस्सू व भल्लिक हे तिथे आले आणि तथागत भगवान ज्या झाडाखाली
बसले होते त्यांच्या जवळच्या दुसऱ्या झाडाखाली सावलीत भोजन करण्यासाठी बसले
असता त्यांच्या मनात तथागत बुद्धांना भोजनदान देण्याची प्रेरणा झाली. आणि
भगवान बुद्धां जवळ येऊन त्यांनी तथागतांना याचना केली . भन्ते , आम्ही आपणास भोजन म्हणून आणलेल्या गोड पदार्थाचा आपण स्वीकार करावा . आम्हांला
समाधान वाटेल .
भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र पुढे केले आणि त्यांच्या गोड पदार्थाचा स्वीकार केला .
भोजन झाल्यावर तथागताने या व्यापाऱ्यांना आपला पहिला धम्म उपदेश केला.
दोन सरणं देऊन त्यांना उपासक केले . दोन सरणं म्हणजे बुद्धं सरणं गच्छामि | धम्मं
सरणं गच्छामि || कारण तोपर्यंत संघाची स्थापना झालेली नव्हती . तथागतांचे हे
प्रथम उपासक झाले . त्या दिवशी जेष्ठ पौर्णिमा होती . त्या दोन व्यापाऱ्यांच्या
विनंतीवरून भगवान बुद्धांनी त्यांना केश धातू भेट दिले .त्या व्यापाऱ्यांनी ब्रम्हदेशात
जाऊन भगवान बुद्धांच्या केश धातूवर १५० फुट उंच स्तूप बांधलेला आहे . तेथील लोक
प्रत्येक जेष्ठ पौर्णिमेला फार श्रद्धेने जमतात आणि पूजापाठ ,वंदना , प्रवचन यांचे
ओयोजन केले जाते . हा स्तूप आजही ब्रम्हदेशात आहे .
जेष्ठ पौर्णिमेचे दुसरे महत्व असे आहे की, तथागत भगवान बुद्धांनी सेनानी कन्या
सुजाताला सेनानी गावात जाऊन धम्माचा उपदेश केला .
जेष्ठ पौर्णिमेचे तिसरे महत्व असे की, चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाची सुकन्या
संघमित्रा भिक्षुणीने बुद्धगयेच्या बोधीवृक्षाची शाखा ( फांदी ) अनुराधापूर , श्रीलंका
येथे नेऊन लावली . आणि बौद्ध धम्म प्रचार कार्याला प्रारंभ केला .त्यादिवशी जेष्ठ
पौर्णिमा होती. संघमित्रा यांच्या प्रेरणेने अनेक स्त्रिया व पुरुष भिक्षु व भिक्षुणी झाले
होते. आज श्रीलंकेत ८० % लोक बौद्ध आहेत . या जेष्ठ पौर्णिमेला येथे लोक एकत्रित होऊन
बुद्धापुजापाठ ,वंदना ,सूत्रपठण करतात. प्रवचनाचे आयोजन केले जाते .
या महत्वपूर्ण घटना जेष्ठ पौर्णिमेला घडल्या आहेत . भगवान तथागतांनी
कपिलवस्तूच्या जनतेला महासमय सुत्त्ताचा उपदेश याच पौर्णिमेला केला आहे.
" तरी सर्व बौद्ध उपासक /उपासिकांना या दिवशी आपल्या जवळच्या बौद्ध
विहारात गेले पाहिजे ."
" सर्वांना पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा "
! जय भिम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!

ग्रेज इन कोर्टात बाबासाहेबांचे तैलचित्र !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमधील ज्या 'ग्रेज इन' कोर्टातून बॅरिस्टर पदवी मिळवली तिथेच आता डॉ. आंबेडकर यांचा एक खास फोटो लावून सन्मान करण्यात आला आहे. जिथून त्यांनी बॅरिस्टर पदवी मिळवली तिथेच त्यांचं तैलचित्र लावणं जाणं हा एक प्रकारे अवघ्या भारताचा बहुमान आहे.


ब्रिटिश राजकीय तज्ज्ञ, मानवाधिकार कार्यकर्ते आणि ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डचे (राज्यसभा खासदार) सदस्य लॉर्ड डेव्हिड अल्टन यांनी ट्विटरवरून लंडनच्या ‘ग्रेझ इन’ ​​मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जा फोटो लावण्यात आला आहे, ते शेअर केलं आहे. यावेळी लॉर्ड डेव्हिड अल्टन यांच्यासमवेत बाबासाहेबांचे पणतू सुजात आंबेडकर हे देखील उपस्थित होते.

लॉर्ड डेव्हिड यांनी ह्यावेळी सुजात आंबेडकर यांना महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे, 21व्या शतकात त्यांनी भारताला जातीपातीच्या विळख्यातून बाहेर काढण्यास प्रयत्न करावेत. लंडनमधील 'ग्रेज इन' ही तीच जागा आहे जिथे बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली बॅरिस्टर ही पदवी मिळवली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर 1916 साली लंडनमधील ग्रेज इनमध्ये बॅरिस्टरच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. सोबतच त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये देखील प्रवेश घेतला होता. जिथे त्यांनी अर्थशास्त्राच्या डॉक्टरेट थीसिसवर काम करणं सुरु केलं होतं आणि जो त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण देखील केला होता. त्यामुळेच त्यांना डॉक्टरेट ही पदवी देखील बहाल करण्यात आली होती.

*मैत्री थाई प्रोजेक्ट च्या माध्यमातून थाईलैंड च्या उपासंका द्वारे 31 Ambulance चे दान*



कोरोना च्या संकटा मधे *थाईलैंड चे पूजनीय भंते अजाहन जयासारो* आणि *त्यांचे थाई बौद्ध धम्म उपासकांनी, IAS Dr. Harshadeep Kamble आणि रोजाना कांबळे* यांच्या सहकार्याने भारता मधे *31 रुग्णवाहिका* चे दान दिले आहे | आज *पुण्यामधे टाटा मोटर्स* या ठिकाणी रुग्णवाहिकांचे भिक्षु संघाच्या उपस्थिती मधे लोकार्पण करण्यात आले | या अतिशय प्रेरणादायी कार्यक्रमाला थाईलैंड चे कॉन्स्युलेट जनरल *श्री सिरिकुल* हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते |

*भगवान बुद्ध* उपदेश देतांना सांगतात जो *प्रतित्यसमुत्पादाला* जाणतो तो धम्माला जाणतो अर्थात हे *जग एकमेकांवर निर्भर आहे*. भगवान बुद्ध दानपारमितेला अत्यधिक महत्व देतात,ही शिकवण अखिल मानव जातीसाठी प्रेरणादायी आहे |
भारतामधे जेव्हा कोरोना ची दूसरी लाट उंचीवर होती तेव्हा दुःख, वेदना आणि चिंतेने ग्रस्त भारतीयांसाठी थाईलैंड च्या बौद्ध उपासक़ांनी मदती चा हाथ दिला |
*संवेदनशीलता, दानपारमिता, मैत्रीभावना, समर्पण आणि महाकरुणा या बुद्ध वचनांचा अनोखा मिलाप* दोन्ही देशांचा दुवा ठरला |


*मैत्री थाई प्रोजेक्ट* च्या माध्यमातून थाईलैंड मधील *थेरवादा फ़ॉरेस्ट ट्रेडिशन चे परमपूजनीय भंते अजान जयासारो* यांच्या आव्हाना नुसार थाईलैंड च्या बौद्ध उपासक़ांनी भारतीय जनतेसाठी बुद्धांनी संगितलेल्या दानभावने नुसार 31 Ambulance * ची बहुमोल अशी मदत केली आहे |
महाराष्ट्रा चे Industry Commissioner हर्षदीप कांबळे यांच्या माध्यमातून ही सर्व मेडिकल सहायता भारताला प्राप्त झाली | त्यापैकी *Oxygen Concentrator आणि Ventilator* चे यापूर्वी वितरण झालेले आहे तर *31 Ambulance चा लोकार्पण समारोह आज पुण्या मधे पार पडला* |
*बोधगया, सारनाथ, राजगीर, कुशीनगर, लेह-लद्दाख़ या बौद्ध स्थला सह नागपुर,औरंगाबाद, बंगलोर, दिल्ली सह भारता मधील 31 ज़िल्हया मधे या Ambulance चे दान दिले जाईल*
या दाम्पत्याचे मनापासून स्वागत आणि मंगलकामना आणि पूजनीय भंते *अजान जयासारो* ज्यांच्या निर्देशाने हे सर्व शक्य झाले त्यांचे आणि Thailand च्या *बौद्ध उपासकांचे* समस्त भारतीय जनते च्या वतीने आभार आणि साधुवाद |
*भवतु सब्ब मंगलम |*

आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका.

"आपल्या समाजातील स्त्री-पुरुषांच्या पोषाखात अलीकडे पुष्कळच चांगला बदल झाला आहे. याबद्दल मला समाधान वाटते. पोशाख भारी किंमतीचाच पाहिजे, असे माझे म्हणणे नाही. पोशाख साधा का असेना, पण तो व्यवस्थित पाहिजे. पेशवाईत कपडे वापरण्यावर व दागिने घालण्यावर आपल्या लोकांवर पुष्कळच निर्बंध होते. अस्पृश्यांनी मळके व फाटकेच कपडे वापरले पाहिजेत व चांदीचे दागिने वापरले पाहिजेत, सोन्याचे दागिने वापरता कामा नये असा निर्बंध होता. परंतु ते निर्बंध आता नाहीत. तरीही आमच्या जुन्या बाया वेळा, तोडे, फुल्या, मासोळ्या व जोडवी हे चांदीचे अवजड व बोजड दागिनेच वापरतात. त्यांनी ते वापरण्याचे सोडून दिले पाहिजे. नाकाला भोक पाडून भली मोठी नथ नाकात अडकविणेही बरे दिसत नाही. आपल्या पोषाखा वरून आपण अमुक एका जातीचे आहोत, असे ओळखता येता कामा नये. नाहीतर काहीवेळा मोठी पंचाईत होते. प्रत्येकाने आपल्या घरात १० आणे किंमतीचा बुद्धांचा फोटो लावावा."

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ,खंड-१८, भाग- ३, पान नं. ३५५)
शुक्रवार दि. २९ मे १९५३ रोजी चेंबूर, मुंबई येथे 'अस्पृश्य संघटना मंडळा' समोर बाबासाहेबांचे भाषण.

वर्षावास म्हणजे काय?


*तथागत बुध्दाने लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक असा जो धम्म सांगितला तो धम्म लोकांपर्यंत पोहचावा आणि मानवाचे जिवन सुखकारक व्हावे यासाठी तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खु संघाला धम्म प्रचार प्रसारासाठी जो आदेश दिला तो पुढील प्रमाणे*
*"चरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय, बहुजन सुखाय,* *लोकानुकम्पाय,*
*अत्थाय हिताय* *देवमनुस्सानं ।*
*देसेथ भिक्खवे* *धम्मं ,आदिकल्याणं मज्झकल्याणं ,* *परियोसानकल्याणं ,*
*सात्थ सव्यञजनं* *ब्रम्हचरियं पकासेथ ॥ "*
*(मराठी अर्थ : भिक्खूहो, बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, मानवांना कल्याणकारी, धम्मपदेश करण्यात तुम्ही प्रवृत्त व्हा. प्रारंभी कल्याणपद , मध्यंतरी कल्याणपद आणि शेवटीही कल्याणपद अशा या धम्ममार्गाचा लोकांना उपदेश करा.)*
*वरील तथागत बुद्धांच्या आदेशानुसार भिक्खु संघ धम्म प्रचारासाठी सर्व ऋतूत चारही दिशांना पायी फिरत असत. या तिन्ही ऋतुत त्याना अनेक संकटांचा सामना करीत, नैसर्गिक संकटांचा सामना करून प्रतिकूल परिस्थितीतही ते धम्माचा प्रचार-प्रसार करीत असत.*
*त्या काळी खूप पाऊस पडत असे. पावसामुळे पायी फिरणे भिक्खु संघाला अशक्य होत असे. पावसाच्या काळात भिक्खुनां* *भिक्षाटनासाठी जाता येत नसल्याने त्यांची ऊपासमारही होत असे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना नदी नाल्यांना आलेल्या पुरात अनेक भिक्खु वाहून जात आणि अनेक भिक्खुंना यामध्ये जिव गमवावा लागत असे. पावसाळयात अनेक आजारांचा भिक्खु संघाला सामना करावा लागत होता.*
*हे सर्व लक्षात घेऊन तथागत बुद्धांनी भिख्खू संघाला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत, एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा अधिक अभ्यास करीत आसपासच्या परिसरातील उपासकांना धम्म ज्ञान देण्याबाबत सूचना दिल्या. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ वर्षावास म्हणुन तेव्हापासुन सुरू झाला. वर्षावास म्हणजे पावसाळयातील निवास.*
*वर्षावास काळात श्रध्दावान उपासक /उपासिका विहारात जावून धम्म श्रवण करीत. विहारात भिख्खूंना श्रध्दाभावनेने भोजनदान करीत.*
*त्यानुसार ईसवी सन पूर्व म्हणजे तथागत बुध्दांच्या काळापासून वर्षावास सुरू आहेत. तथागत बुध्दांनी त्यांचा पहिला वर्षावास इ.स.पूर्व ५२७ला ऋषीपतन सारनाथ येथे व्यतीत केला व इ.स.पूर्वी ४८३ ला शेवटचा ४५ वा वर्षावास केला. त्यानी स्वतः श्रावस्ती, जेतवन, वैशाली, राजगृह इत्यादी विहरात वर्षावास केले. अशा प्रकारे सद्धम्माचा प्रचार तथागत बुध्दांनी करून मानवाला धम्मपथाच्या राजमार्गावर आरूढ केले.*
*वर्षावासाचे नाते भगवान गौतम बुध्दांच्या जीवनातील अनेक संस्मरणीय घटनांशी निगडीत आहे.*
*आषाढ पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो आणि अश्विन पौर्णिमेला संपन्न होतो. बौध्द धम्मात वर्षावासाला अनन्य साधारण महत्व आहे.*
*सर्व बौध्द उपासक उपासिकांनी या चार महिन्याच्या कालावधीत स्वताच्या घरी रोज डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या " बुध्द आणि त्यांचा* *धम्म" या पुस्तकाचे किंवा अन्य बुद्ध धम्माशी संबंधित पुस्तकाचे रोज सामुहिक वाचन करून त्यावर मनन चिंतन करावे व त्याचे आपल्या जिवनात अनुकरण केले पाहिजे. नियमितपणे शेजारच्या बुध्द विहारात जावून धम्म श्रवण करावा व धम्ममार्गावर आरूढ व्हावे. धम्मदान द्यावे. उपोसथ व्रत घेऊन अष्टशिलाचे पालन करून सद्गुणांचा पाया मजबूत करावा. आपल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबास यानुसार आचरण करण्यास प्रोत्साहित केल्यास बौध्द उपासकांचा भला मोठा संघ तयार होईल. आणि बाबासाहेबांनी पाहिलेल्या प्रबुध्द भारताचे दिव्य स्वप्न साकार होण्यास हातभार लागेल.
!जयभीम ! !!जयभारत !! !!!नमोबुद्धाय!!!

Wednesday, July 7, 2021

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त..


'माझ्या नागसेनवनात एक वृक्ष माझाही '

आजी माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

गुरुवार दि .८ जुलै रोजी । सकाळी ११:३० वाजता

स्थळ - लुम्बिनी उद्यान,नागसेनवन,
औरंगाबाद येथून प्रारंभ

आयोजक-मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशन (महा.)

👏सर्व आजी माजी विद्यार्थी मित्रांनी वृक्षदान सहभाग नोंदवावा ही विनंती

अखेर ABCPR लेणी संवर्धक टिमचा दबदबा पहील्यापासुन ते आतापर्यंत कायमच....

२४जुन २०२१रोजी ABCPR लेणी संवर्धक टिम ठाणाळे बुध्दलेणीची अपडेट घेण्याकरता गेले असता तेथिल स्तुपा गँलेरी मधिल बहुतांशी सर्वच स्तुपांच्यावर काही अज्ञात,मुर्ख लोकांनी अश्लिल,खोडसाळ जाणुनबुझुन प्रकारे नावे लिहीली होती.परंतुअश्या प्रकाराची दखल घेणार नाही ते आम्ही ABCPR चे लेणी संवर्धक कसले....लगेच टिमने त्याच दिवशी पुरातत्व खात्याला या गंभीर घटनेची फोन द्वारे,मेल,लेटर द्वारे दखल घ्यायला लावली.लगेच दुसर्या दिवशीच पुरातत्व खात्याच्या अधिकार्यांनी तेथिल कर्मच्याला दम भरुन या गंभिर प्रकाराची त्वरील दखल घ्यायला लावली.त्याने त्वरीत येऊन ठाणाळे लेणीवरील स्तुपा गँलेरी येथिल सर्वच स्तुपावरील खोडसाळ नावे हटवण्याचा प्रयत्न केला.परंतु या गंभिर घटणेची प्रत्यक्षात दखल घेण्यासाठी अखंड ABCPRलेणी संवर्धक टिम या रविवारी४जुलै२०२१रोजी जातीने लेणीवर हजर राहुन परत स्तुपावरील राहीलेली अश्लिल, खोडसाळ नावे मिटवण्यासाठी परिपूर्ण श्रमपुर्वक अखंड टिम जुडली होती आणि त्यामध्ये आम्ही सर्वजन सक्सेस ही झालो.स्तुंपाच्या पावित्र्याची काळजी,दक्षता घेऊन पुर्णपणे स्तुपावरील खोडसाळ नावे काळजीपूर्वक मिटवल्या गेले.या महत्वपुर्ण धम्मकार्यामध्ये सहभागी झालेल्या आमच्या तमाम धम्मबंधु-भगिनींचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो.


जिथे जिथे आम्हा बौध्दांच्या ऐतिहासिक प्राचिन बुध्दलेण्यांवर,वास्तुंवर,स्थळांवर अश्या गंभिर प्रकार होतील त्या गंभिर प्रकरणाची ABCPR लेणी संवर्धक टिम प्राक्टिकल कार्यातुन काळजीपूर्वक कायदेशीर पणे यापुढे दखल घेत राहीलच.

आमच्या तमात बौध्द तरुणांना आम्ही ABCPR लेणी संवर्धक टिम आव्हाण करत आहोत की,आपण आपल्या या ऐतिहासिक प्राक्टिकल, कृतीकार्यक्रमात,धम्मकार्यात सामिल व्हावे.आणि बाबासाहेब यांनी दिलेला हा दैदिप्यमान प्राचिन वारसा जतन तथा संवर्धन करण्यासाठी सज्ज व्हा.


🍂एक पाऊल धाडसाचे
बौद्ध वारसा जपण्याचे🍃
ABCPR लेणी संवर्धक टिम
💥टिमच्या प्राक्टिकल कृतिकार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क:
मुकेश जाधव :9730129266
रविंद्र सावंत:9321214805

सेलू तालुक्यातील अनिता गायकवाड यांची PSI पदी निवड!

आज मोरेगाव येथे आमची भगिनी अनिता धोंडीबा गायकवाड यांची पोलिस उप निरीक्षक(PSI) पदी निवड झाल्या बद्दल तक्षशिला प्रतिष्ठान सेलूच्या वतीने ताईंचा व आई बाबांचा सत्कार करन्यात आला.*

*या वेळी आमचे मार्गदर्शक ऍड. हर्षवर्धन सोनकांबळे, अमोल डंबाळे सर,सिद्धार्थभाऊ भुक्तर,संदेश जाधव व मी उपस्थित असताना एक अनमोल क्षण.*



Thursday, July 1, 2021

विपश्यना साधना प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती 

 


* विपश्यना ध्यान साधना ही गौतम बुध्द यांनी शिकवलेली भारताची प्राचीन विद्या आहे.

* बुध्दा ने धम्म शिकविला, बौध्द धम्म नव्हे.
* सर्व जाती धर्माचे लोक शिबिरामध्ये भाग घेऊ शकतात.
* विपश्यना शिकण्यासाठी पहिला कोर्स १० दिवसाचा असतो.
* हि विद्या विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजी द्वारे शिकवली जाते.
* सत्यनारायण गोयंका गुरुजी सध्या हयात नसल्यामुळे त्यांच्या द्वारे रेकॉर्ड करण्यात आलेल्या ऑडिओ , व्हिडिओ द्वारे शिकवली जाते.
* विपश्यना ध्यान साधना शिकण्यासाठी काही खर्च नाही. ती निःशुल्क शिकवली जाते.
* वय वर्ष २० - ६५ वर्ष वयोगटातील कुणीही व्यक्ती ह्या मध्ये सहभागी होऊ शकतात.
* विपश्यना साधना VIA (Vipassana International Academy) द्वारे स्थापित केलेल्या विपश्यना केंद्रांतून शिकवली जाते.
* हि साधना बुध्दाच्या विद्येचा प्रॅक्टिकल अस्पेक्ट आहे.
* त्यासाठी १० दिवस तिथेच राहुन ध्यानसाधना शिकावी लागते.
* पंचशील पालन करून १० दिवस मौन राहावे लागते, बाह्य जगाशी पूर्णतः संपर्क बंद ठेवावा लागतो.
* दररोज पहाटे ४:३० वाजता उठावे लागते, रात्री ९:३० पासुन आराम.
 



महाराष्ट्रातील विपश्यना केंद्रांची यादी व त्यांचे संपर्क -
 

Maharashtra

Akola:
Mr. Shrikant S. Patil
Tel: 07265-252003, 253456.
Akot:
Mr. Mohanlal Agarwal,
Tel: 07258-223225
Bhusaval:
Mrs. P. M. Kotecha,
Tel: 224431
Buldhana:
Shyam Tayde,
Tel: 07262-247127
Chandrapur:
Milind Gharde,
Tel: 07172-262477, 225593.
Khamgaon:
J. S. Tomar, Bobade Colony,
Tel: 07263-250978
Kotamba:
Mr. Vijay Dange
Tel: 241346, 239245.
Nandurbar:
Dr. Prasad Sonar
Tel: 02564-222731
Nanded:
Dr. Sangram Jondhale.
Tel: 235232, 243208.
Pravaranagar:
Mr. D. E. Dhumal
Tel: 02422-252279
Shegoan:
Tarachand Gwalani
Tel: 253456
Washim:
Rajabhau Raut
Tel: 07252-234933
Yavatmal:
E. D. Gadling, Vaishali Soc. Yavatmal,
Tel: 07232-50808.



 

हिंदु कोड बिल: लव यु बाबासाहेब!

  यु बाबासाहेब " बाबासाहेब दिल्लीवरून नेहरूंची तार आली आहे ते म्हणतायेत की, हिंदू कोड बिल ला देशात सर्वत्र विरोध सुरू आहे. त्यामुळे हे...