Monday, January 25, 2021

२६ जानेवारी: देशाला संविधान बहाल केलेल्या दिनीच सत्यनारायणाची पुजा का ?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांचे राज्य संपुष्टात येऊन आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर देशातील थोर नेत्यांनी भारताचा एकसंघ असा कायदा किंवा संविधान निर्माण करण्याच्या कार्याला सुरुवात केली. 


संविधान निर्मितीचे महान कार्य करण्यासाठी घटना समिती निर्माण करण्यात आली. त्यामधील काही सदस्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे आणि काही अप्ररिहार्य कारणामुळे संविधान निर्मितीचे मोलाचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवस रात्र एक करून २ वर्ष ११ महिने १८ दिवसात संविधान निर्मितीचे काम पूर्ण केले. भारत देशातील विविध जाती, धर्म पंथातील लोकांना एकसंघ ठेवण्याचे कार्य राज्य घटनेच्या माध्यमातून होते आहे . 

भारताचे संविधान सर्वाना समान संधी मिळवुन देत आहे.  तळागाळातील व्यक्तींसह श्रीमंत लोकांनाही समान न्याय देण्याचे काम संविधान ने केले आहे. महिलांचा सम्मान, जाती निर्मूलन, मूलभूत अधिकार, नागरिकता, एक मताचा अधिकार असे अनेक हक्क आपसर्वाना संविधानानेच दिले.  

असे असले तरी काही लोक संविधान विरोधी कृत्य करत आहेत. ह्या देशाला २६ जानेवारी १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना बहाल केली, डॉ. राजेंद्र प्रसाद तत्कालीन राष्ट्रपती यांना नवनिर्माण केलेले संविधान सुपूर्द केले हाच तो दिवस. आणि ठीक १ वर्षानंतर राज्यघटना कार्यान्वित होऊन समस्त भारत देशाचा कारभार संविधाना नुसार चालु झाला. ह्या दिवसाला २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन असे संबोधण्यात आले. 

तर ह्या दिवसाचे अनन्यसाधारण महत्व आहे. असे असतानाही काही सुजाण नागरिक ध्वजारोहण करत असताना प्रजासत्ताक दिनाचा बाबासाहेब आंबेडकर घटना सुपूर्द करीत असतनाचा फोटो न ठेवता त्या जागी दुसरेच फोटो ठेवण्याचे कट कारस्थान करित आहेत. 

कुणी ह्याच दिवशी सातत्यनारायण पूजन करताहेत. तसे पाहता संविधानानेच सर्वाना आपापला धर्म पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. पण त्यात्या दिनाचे महत्व जाणुन ते आधी केलेच पाहिजे हे ही तेवढेच खरे आणि हितावह आहे. आपल्या देवतांचे पूजन भजन करायला इतर दिवस आहेतच ना.. 

आपण ह्याचा विचार कराल हिच अपेक्षा !

Thursday, January 21, 2021

आपल्या मुलांना यशस्वी बनवायचे असेल तर बाबासाहेबांचे 'विद्यार्थ्यांनो जागृत व्हा' हे भाषण जरूर वाचा !


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशुन केलेले भाषण !

"विध्यार्थी दशेत कसे वागावे याबाबत मी स्वानुभवाने काहींना काही सांगु शकेन. ज्या समाजात हजारो वर्ष पावेतो   कसलेही शिक्षण न्हवते. त्या समाजातील पुष्कळ लोक अलीकडे बी. ए. व एम. ए. वगैरे विद्यापीठाच्या पदव्या घेऊन बाहेर पडताना पाहून कोणास समाधान वाटणार नाही ? 


तुम्ही जे शिक्षण घेता ते असे घ्या त्यामुळे आपले सर्व विद्यार्थी सरस झाले पाहिजेत. अडाणी आई बापाच्या पोटी जन्म घेऊन जर बी. ए. झालात तर त्याबद्दल दुरभिमान बाळगु नका. आपल्या कर्तव्याची जाणीव ठेऊन झटुन अभ्यास करा. 

आत्मविश्वासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदाहरणार्थ कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेला पहिलवान दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गेल्यास त्याच्या हातुन काहीतरी होणे शक्य आहे काय ? मी तर नेहमी असे म्हणत असतो, की मी जे करेन ते होईल. अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो . 

गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यांपेक्षा माझी त्यावेळी चांगली मोठी सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आई बाप भावंडे यांच्या सोबत राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर मी अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटाना तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो, तर तुम्हास आजच्या साधनसामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल? कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी उपजु शकत नाही. विद्यार्थी दशेत इंग्लंड मध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास ८ वर्ष लागतात, तो अभ्यास मी २ वर्ष आणि ३ महिन्यात यशस्वीरीत्या पूर्ण केला. हे करण्यासाठी मला २४ तासापैकी २१ तास अभ्यास करावा लागला. जरी आज माझी चाळीशी उलटून गेली असली, तरी मी अजूनही २४ तासांपैकी सारखा १८ तास काम करत असतो. 

दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यश प्राप्ती होते. नुसत्या पदव्या मिळवण्याने काही होणार नाही. आपल्या विद्यार्थ्यांची अशी समजूत झालेली असते, की बी. ए. पदवीधर झाला, की आता पुढे काहीच शिकायचे राहिले नाही; परंतु खरे पाहता  बी. ए. झाल्यावर फार झाले, तर शिक्षकांशिवाय स्वतंत्रपणे अभ्यास करता येईल. म्हणजेच जे शिकायचे आहे ते पुढेच असते.   माणसाने जन्मभरी जरी शिकायचे मनात आणले, तरी विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल. 

विद्याबरोबरच आमच्यात शील असले पाहिजे. शिलाशिवाय विद्या फुकाची आहे; कारण विद्या एक शस्त्र आहे. एखाद्याजवळ विद्येचे शस्त्र असेल व तो शीलवान असेल तर त्योयोगे तो एकाचे संरक्षण करील. तोच इसम जर शीलवान नसेल तर, विद्येच्या शस्त्राने दुसरायचा घात करील. विद्या ही तलवारीसारखी आहे; परंतु तिचे महत्व तिला धारण करणाऱ्यावर अवलंबुन राहील, कारण अडाणी मनुष्य साधारणपने कोणास फसवू शकत नाही. फसवावे कसे हेच त्याला उमगत नाही; परंतु शिकल्या-सावरलेल्या लोकांच्या ठिकाणी कोणास कसे फसवावे व त्या फसवण्यासाठी लागणारा युक्तिवाद असल्याने खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे ते भासवू शकतात. 

लबाडी करण्यास चातुर्य व बुद्धी लागते; परंतु चातुर्य व बुद्धी हिला सदाचाराची अर्थात शिलाची जोड मिळाली, तर लबाडी अगर फसवा फसवी करावीशी वाटणार नाही आणि म्हणुन शिकल्या सवरलेल्या लोकांत शिलाची अत्यंत जरुरी आहे. शिलाशिवाय जर शिकले सवरलेले लोक निपजू लागले, तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे. तेंव्हा शिलाची शिक्षणापेक्षा किती अधिक किंमत आहे, हे तुमच्या ध्यानी आले असेलच आणि म्हणुन प्रत्येक इसमास प्रथम शील असले पाहिजे. 

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
बालभारती      

1000+ original photo collections of Dr. Babasaheb Ambedkar

Wednesday, January 20, 2021

एक नाही ...आता 14 विद्यापीठे बाबासाहेबांच्या नावे आहेत!
1) डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ, तेलंगणा 2)बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ, मुजफ्फरपूर

3)आंबेडकर विद्यापीठ दिल्ली

4) डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय विधी विद्यापीठ — सोनिपत, हरियाना

5)डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ, महू, मध्य प्रदेश

6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, महाराष्ट्र

7)डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम

8 ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, महाराष्ट्र

9)डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, गुजरात

10) डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, पंजाब

11) तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ, चेन्नई

12) बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनौ, उत्तर प्रदेश

13 डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा, उत्तर प्रदेश

14)डॉ. भीमराव आंबेडकर विधी विद्यापीठ, जयपूर, राजस्थान


सिद्धार्थ शिनगारे

Tuesday, January 19, 2021

वंचितच्या तृतीय पंथी अंजली पाटील यांचा दणदणीत विजय, झाल्या सरपंच !


तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. 

आपल्या कडे वंचित घटक जसे व्यवस्थेने दुर्लक्षित केले आहेत त्याहुनही दुर्लक्षित घटक तुच्छतेचे भावनाना काहीही दोष नसताना इथल्या तृतीय पंथी अनेक शतक सोसत आला आहे.


अशा परिघा बाहेर फेकलेल्या समुहासाठी लढा उभारणारया आपल्या साथी वंबआ च्या युवा आघाडीच्या राज्य सदस्य व तृतीयपंथी समुहातुन येणारया राज्यस्तरीय नेत्या मा.शमिभाताई पाटील यांनी डे वन पासुन अंजली पाटील यांचा अर्ज निवडणुक आयोगाने केवळ तृतीय पंथी म्हणुन नाकारला या करता खंडपीठातील न्यायिक लढा त्यांना यशस्वी पार पाडत निवडणुक उमेदवारी अर्ज वैद्य करीत अंजली पाटील यांना मिळवुन दिली त्या स्वता गावात प्रचारासाठी थांबल्या!

Top 10 Books written by Dr. Babasaheb Ambedkar

 Top 10 Books written by Dr. Babasaheb Ambedkar

जाणुन घ्या बौद्धांचे महत्वाचे दिनविशेष!१ जानेवारी - 
भीमा कोरेगाव शौर्य दिन (1818) 
सुभेदार रामजी आंबेडकर जयंती 

३  जानेवारी
सावित्रीबाई फुले जयंती  (1831)

८ जानेवारी 
बौध्द धम्म ध्वज दिन (1880)

१२ जानेवारी 
राष्ट्रमाता जिजाऊ जयंती (1598)
स्वामी विवेकानंद जयंती (1863)

१४ जानेवारी -  
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन  (1994)


२३ जानेवारी 
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती (1897)

२६ जानेवारी 
प्रजासत्ताक दिन   (1950)

३० जानेवारी 
मोहनदास गांधी स्मृती दिन (1948)

२ फेब्रुवारी 
सुभेदार रामजी आंबेडकर स्मृतिदिन (1913)


7 फेब्रुवारी 
माता रमाबाई आंबेडकर जयंती (1898)

14 फेब्रुवारी 
भीमाबाई आंबेडकर जन्मदिन 


१७ फेब्रुवारी 
लहुजी साळवे स्मृतिदिन (1881)

19 फेब्रुवारी 
छत्रपती शिवाजी महाराज जयंती (1630)
संत गुरु रविदास जयंती (1450)

23 फेब्रुवारी 
संत गाडगेबाबा जयंती (1876)

6 मार्च 
काळाराम मंदिर सत्याग्रह दिन 

8 मार्च 
जागतिक महिला दिन 

9 मार्च 
संत तुकाराम महाराज स्मृती दिन 

१० मार्च 
सावित्रीबाई फुले स्मृतिदिन (1897)

11 मार्च 
संभाजी महाराज पुण्यतिथी (1689)
च. सयाजीराव गायकवाड जयंती (1863)


15 मार्च 
कांशीराम जयंती (1934)

20 मार्च 
महाड चवदार तळे क्रांतिदिन 

२३ मार्च 
भागातीसिंग स्मृतिदिन - शाहिद दिन (1931)


4 एप्रिल 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचा विवाह (1906)

7 एप्रिल 
जागतिक आरोग्य दिन 

८ एप्रिल 
सम्राट अशोक जयंती 

११ एप्रिल 
राष्ट्रपिता महात्मा फुले जयंती (1827)

14 एप्रिल 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (1891)
  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न बहाल (1990) 

15 एप्रिल 
  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा डॉ. शारदा कबीर यांच्याशी विवाह (1948)


30 एप्रिल 
संत तुकडोजी महाराज जयंती 


१ मे 
महाराष्ट्र दिन (1960)


4 मे 
द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापना दिन 

६ मे 
शाहू महाराज स्मृती दिन (1922)

8 मे 
महास्थविर चंद्रमणी निर्वाण (1962)

10  मे 
प्रकाश आंबेडकर यांचा जन्मदिन 

१४ मे  
संभाजी महाराज जयंती (1657)

15  मे  
वामनदादा कर्डक स्मृतिदिन (2004)

27  मे  
माता रमाई स्मृतिदिन (1935)

31  मे  
अहिल्याबाई होळकर जयंती (1725)

9 जून 
बीरसा मुंडा स्मृतिदिन (1900)

17  जून 
राजमाता जिजाऊ पुण्यतिथी  (1674)

19  जून 
मिलिंद महाविद्यालयाची स्थापना (1950)

20  जून 
सिध्दार्थ  महाविद्यालयाची स्थापना (1946)
 
22  जून 
भदंत आनंद कौसाल्यायन स्मृतिदिन (1988)


२६   जून 
राजर्षी शाहू महाराज जयंती (1874)

२७ जून 
संत कबीर जयंती 


६ जुलै
दलाई लमा जन्मदिवस 

८  जुलै

पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना (1945)

11  जुलै
रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर हत्याकांड स्मृतिदिन (1997)

14  जुलै
भीमाबाई आंबेडकर जन्मदिन 

१८  जुलै
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन (1989)

1 ऑगस्ट
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती (1920)

13  ऑगस्ट 
अहिल्याबाई होळकर स्मृतिदिन (1795)

15   ऑगस्ट 
स्वातंत्र्य दिन 
वामनदादा कर्डक जयंती (1922) 

17 सप्टेंबर 
पेरियार स्वामी जयंती (1879)
भैयासाहेब आंबेडकर स्मृतिदिन (1977)
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (1948)

24  सप्टेंबर
सत्यशोधक समाज स्थापना दिन 

२८  सप्टेंबर
भगतसिंग जयंती (1907)


८ ऑक्टोबर 
सम्राट अशोक धम्म दीक्षादिन 

९  ऑक्टोबर 
कांशीराम स्मृती दिन 

११  ऑक्टोबर 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृतिदिन (1968)

14  ऑक्टोबर 
धम्म चक्र प्रवत्तन दिन  (1956)

15  ऑक्टोबर 
कर्मवीर दादासाहेब गायकवाड जयंती (1902)

7 नोव्हेंबर 
विद्यार्थी दिवस सातारा येथे इंग्रजी पहिल्या वर्गात प्रवेश (1900)


14  नोव्हेंबर 
वस्ताद लहुजी साळवे जयंती (1794)

15  नोव्हेंबर 
बिरसा मुंडा जयंती (1875)

26  नोव्हेंबर 
संविधान दिन (1949)

28  नोव्हेंबर 
महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन (1890)

6 डिसेंबर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरनिर्वाण दिन

१० डिसेंबर
मानव हक्क दिन

१२ डिसेंबर
भैया साहेब आंबेडकर जयंती (1912)

२० डिसेंबर
संत गाडगेबाबा स्मृतीदिन

२४ डिसेंबर
पेरियारस्वामी स्मृतीदिन (1973)


२५ डिसेंबर
मनुस्मृती दहन दिन
भारतीय स्त्री मुक्ती दिन

२९ डिसेंबर
कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृतीदिन (1971)२६ जानेवारी: देशाला संविधान बहाल केलेल्या दिनीच सत्यनारायणाची पुजा का ?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांचे राज्य संपुष्टात येऊन आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर देशातील थोर नेत्यांनी भारताचा एकसंघ असा कायदा किंवा...