Sunday, April 21, 2024

हिंदु कोड बिल: लव यु बाबासाहेब!

 

❤️ यु बाबासाहेब
" बाबासाहेब दिल्लीवरून नेहरूंची तार आली आहे ते म्हणतायेत की, हिंदू कोड बिल ला देशात सर्वत्र विरोध सुरू आहे. त्यामुळे हे बिल संसदेत पारित होणार नाही.
" स्त्रियांच्या शैक्षणिक,पुनर्विवाह,आणि घटस्फोट या मागण्यांना प्रचंड विरोध आहे.
" देशात जर स्त्रियांना हे हक्क जर यावेळी दिले तर देशात असहिष्णुता जन्म घेईन आणि नव्या वादाला वाचा फुटेल.
त्यामुळे देशात स्थेर्य राखण्यासाठी सदर बिल आम्ही रद्द करीत आहोत.
" तुमच्या स्त्रियांच्या उन्नतीच्या तळमळीला आम्ही समजू शकतो आमच्या या निर्णयाला तुम्ही ही समजून घ्या.
"" बाबासाहेब रागावले,क्षणभर विचार केला.
" आणि ते नेहरूंना लिहतात.
स्त्रियांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळावे म्हणून हे बिल मी संसदेत मांडले होते परिणामी ते पारित न होता खारीज होत आहे याचे मला अतोनात दुःख होत आहे.
खरंतर स्त्रियांच्या प्रगतीसाठी मी मंत्रिमंडळात सहभागी झालो होतो... स्त्रियांना मूलभूत अधिकार देणे हाच माझा हेतू होता परिणामी तो जर सफल होत नसेल तर मी माझ्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा देत आहे तो स्वीकार करावा कळावे.
_देशातल्या बहुधा स्त्रियांना हे माहित नसेल की त्यांच्या अधिकारासाठी जे आज मिळत आहेत त्यासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारे प्रथम व्यक्ति हे बाबासाहेब होते.
ते स्वंतत्र भारतातील पाहिले कायदेमंत्री होते...
" पहिले राष्ट्रपती, पाहिले पंतप्रधान सगळं काही लक्षात असेल तर पहिल्या कायदेमंत्र्यांचे विस्मरण होणे दुःखदायक आहे.
नंतर हे बिल एकूण चार टप्यात पास करण्यात आले.
"वर्षानुवर्षे केवळ चूल आणि मूल यात बंदिस्त असणारी स्त्री मुक्त झाली.
संकलन_शब्दलेखन-प्रविण
-संदर्भ_बाबासाहेब अनटोल्ड truth...

No comments:

Post a Comment

हिंदु कोड बिल: लव यु बाबासाहेब!

  यु बाबासाहेब " बाबासाहेब दिल्लीवरून नेहरूंची तार आली आहे ते म्हणतायेत की, हिंदू कोड बिल ला देशात सर्वत्र विरोध सुरू आहे. त्यामुळे हे...