पराक्रम करणे , अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणे हे आपल्या रक्तामध्ये आहे,
आपले पूर्वज पराक्रमी होते, लढवय्ये होते हे भीमा कोरेगाव च्या घटनेतून आपल्या लक्षात आले असेलच,
जेव्हा जेव्हा देशाला गरज असेल तेव्हा भीम सैनिकांनी आपले बलिदान दिलेले आहे. आंबेडकरी चळवळ ते काम खुप छान निभावत आहे.
आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. कायद्याचे राज्य स्थापन करण्याचे डॉ. आंबेडकर यांचे स्वप्न साकार करूयात. बाबासाहेबानी संविधान रूपामध्ये खुप अनमोल अशी भेट आपणांस दिलेली आहे. त्याचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
आज आपल्या कडे कसल्याच गोष्टीची कमी नाही,आपल्या मध्ये विद्वान लोक आहेत, शिक्षित लोक आहेत, भरपूर नौकरदार वर्ग सुद्धा आहे तरी आपण संघटित नाही आहोत. राजकीय स्तिथी तर खूपच दयनीय आहे.
मान्यवर कांशीरामजी यांनी उत्तरप्रदेश मध्ये जे संघटन उभे करून सत्ता काबीज केली तसे आपणाला सध्या सहज करता येऊ शकते, पण तसे होताना दिसत नाही.
बुध्दांचा धम्म आणि देशाचे संविधान अशा २ गोष्टी आपल्या सोबत असताना आपणाला चिंता करायची काहीच गरज नाही. फक्त कायद्या प्रमाणे आणि धम्मा प्रमाणे मार्गक्रमण करीत रहा !
भीमा कोरेगांव विजयी दिनानिमित्त शूर बहाद्दुर सैनिकांना सलाम ज्यांनी पेशवाई संपविण्यासाठी फक्त ५०० महारांनी २८००० पेशव्यांना धूळ चारली !
0 Comments