Hot Posts

6/recent/ticker-posts

'रमाई आवास योजना' विषयी संपूर्ण माहिती

 रमाई आवास योजना ही अनु.जमाती साठी शासनाची योजना आहे,यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे sc चा जातीचा दाखला,1 लाखाचे आत उत्पनाचा दाखला,रेशन कार्ड,आधार कार्ड,राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते पुस्तक,जागेचा उतारा,ग्रामसभेत नाव निवडीचा ठराव,जागा स्वतःची नसल्यास यासाठी शासकीय जागा पण चालते,वरील प्रमाणे कागदपत्र आवश्यक आहे.

वरील योजने साठी स्वतःची जागा नसल्यास जागा खरेदी करायला 50 हजार पर्यंत वेगळं अनुदान पंडित दीनदयाळ योजने अंतर्गत प्राप्त होऊ शकते.

ग्रामपंचायत मध्ये फॉर्म उपलब्ध असतात, हा फॉर्म भरून त्यासोबत ग्रामपंचायत मासिक सभा अथवा ग्रामसभेचा ठराव, जातीचा दाखला, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स इत्यादी पेपर पंचायत समितीच्या समाजकल्याण विस्तार अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे, व फक्त सुपूर्द करून थांबने योग्य नाही, त्याचा पाठपुरावा करावा लागतो

फॉर्म ग्रामपंचायतमध्ये न देता डायरेक्ट पंचायत समितीच्या समाजकल्याण विस्तार अधिकाऱ्यांकडे देणे.



Post a Comment

0 Comments