Hot Posts

6/recent/ticker-posts

राजा असावा तर सम्राट अशोका सारखा!

अशोकाच्या काळात भारताने जगातली ३३ टक्के बाजारपेठ काबीज केली हाेती म्हणूनच जागतिक बाजारपेठेत भारताचे वर्चस्व होते.प्रत्येक व्यापारी कर भरताे किंवा नाही हे कसोटी ने पाहिले जात हाेते.कर वाढवण्यासाठी शेतीमाल व व्यापारवाढीचे प्रयत्न केले जात.सम्राट अशोकाचे गुप्तहेर सर्व प्रदेशभर पसरले होते आणि म्हणून प्रत्येक विभाग आणि प्रधानमंत्र्याच्या कामाचा तपशील त्याला मिळत असे.प्रत्येक गावाची माहिती त्याच्याकडे असे.याच कारणामुळे राजधानीपासून बाराशे मैल लांब असणाऱ्या काबूलवर जसा त्याचा वचक होता तसेच शेकडो मैल दूर असणाऱ्या गिरनारमध्येही दबदबा हाेता. राज्याभिषेकाच्या नवव्या वर्षी केलेल्या कलिंग युद्धानंतर पुढील अठ्ठावीस वर्षे सम्राट अशोकाचे राज्य निर्विघ्नपणे,कुठलेही युद्ध न करता,प्रजेच्या हिताची काळजी घेणारे आदर्श राज्य ठरले.कलिंगाच्या युद्धानंतर अशोकाने स्वत:ला पूर्णपणे लोककल्याणासाठी झोकून दिले.आपल्या प्रजेला कुठलाही त्रास होऊ नये,कुणावर अन्याय होऊ नये यासाठी ताे दक्ष असे.बौद्ध धम्माचे विचार पटल्यामुळे,अशोकाला आपल्या प्रजेने नीतीनुसार आचरण करावे असे वाटे.भारताच्या लिखाणाचा इतिहास सम्राट अशोकाच्या शिलालेखापासून प्रारंभ हाेताे.२२०० वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने दिलेला संदेश आजही किती चपखल लागू पडताे! एकंदरीत आदर्श,लोककल्याणकारी राजा कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अशोक.सम्राट अशोकाने सुशासनाच्या संदर्भात घालून दिलेल्या परिमाणांचे जतन अाणि संवर्धन केले जावे अशीच त्याची अपेक्षा असणार आहे



Post a Comment

0 Comments