२४जुन २०२१रोजी ABCPR लेणी संवर्धक टिम ठाणाळे बुध्दलेणीची अपडेट घेण्याकरता गेले असता तेथिल स्तुपा गँलेरी मधिल बहुतांशी सर्वच स्तुपांच्यावर काही अज्ञात,मुर्ख लोकांनी अश्लिल,खोडसाळ जाणुनबुझुन प्रकारे नावे लिहीली होती.परंतुअश्या प्रकाराची दखल घेणार नाही ते आम्ही ABCPR चे लेणी संवर्धक कसले....लगेच टिमने त्याच दिवशी पुरातत्व खात्याला या गंभीर घटनेची फोन द्वारे,मेल,लेटर द्वारे दखल घ्यायला लावली.लगेच दुसर्या दिवशीच पुरातत्व खात्याच्या अधिकार्यांनी तेथिल कर्मच्याला दम भरुन या गंभिर प्रकाराची त्वरील दखल घ्यायला लावली.त्याने त्वरीत येऊन ठाणाळे लेणीवरील स्तुपा गँलेरी येथिल सर्वच स्तुपावरील खोडसाळ नावे हटवण्याचा प्रयत्न केला.परंतु या गंभिर घटणेची प्रत्यक्षात दखल घेण्यासाठी अखंड ABCPRलेणी संवर्धक टिम या रविवारी४जुलै२०२१रोजी जातीने लेणीवर हजर राहुन परत स्तुपावरील राहीलेली अश्लिल, खोडसाळ नावे मिटवण्यासाठी परिपूर्ण श्रमपुर्वक अखंड टिम जुडली होती आणि त्यामध्ये आम्ही सर्वजन सक्सेस ही झालो.स्तुंपाच्या पावित्र्याची काळजी,दक्षता घेऊन पुर्णपणे स्तुपावरील खोडसाळ नावे काळजीपूर्वक मिटवल्या गेले.या महत्वपुर्ण धम्मकार्यामध्ये सहभागी झालेल्या आमच्या तमाम धम्मबंधु-भगिनींचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो.
जिथे जिथे आम्हा बौध्दांच्या ऐतिहासिक प्राचिन बुध्दलेण्यांवर,वास्तुंवर,स्थळांवर अश्या गंभिर प्रकार होतील त्या गंभिर प्रकरणाची ABCPR लेणी संवर्धक टिम प्राक्टिकल कार्यातुन काळजीपूर्वक कायदेशीर पणे यापुढे दखल घेत राहीलच.



0 Comments