Tuesday, July 13, 2021

आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका.

"आपल्या समाजातील स्त्री-पुरुषांच्या पोषाखात अलीकडे पुष्कळच चांगला बदल झाला आहे. याबद्दल मला समाधान वाटते. पोशाख भारी किंमतीचाच पाहिजे, असे माझे म्हणणे नाही. पोशाख साधा का असेना, पण तो व्यवस्थित पाहिजे. पेशवाईत कपडे वापरण्यावर व दागिने घालण्यावर आपल्या लोकांवर पुष्कळच निर्बंध होते. अस्पृश्यांनी मळके व फाटकेच कपडे वापरले पाहिजेत व चांदीचे दागिने वापरले पाहिजेत, सोन्याचे दागिने वापरता कामा नये असा निर्बंध होता. परंतु ते निर्बंध आता नाहीत. तरीही आमच्या जुन्या बाया वेळा, तोडे, फुल्या, मासोळ्या व जोडवी हे चांदीचे अवजड व बोजड दागिनेच वापरतात. त्यांनी ते वापरण्याचे सोडून दिले पाहिजे. नाकाला भोक पाडून भली मोठी नथ नाकात अडकविणेही बरे दिसत नाही. आपल्या पोषाखा वरून आपण अमुक एका जातीचे आहोत, असे ओळखता येता कामा नये. नाहीतर काहीवेळा मोठी पंचाईत होते. प्रत्येकाने आपल्या घरात १० आणे किंमतीचा बुद्धांचा फोटो लावावा."

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ,खंड-१८, भाग- ३, पान नं. ३५५)
शुक्रवार दि. २९ मे १९५३ रोजी चेंबूर, मुंबई येथे 'अस्पृश्य संघटना मंडळा' समोर बाबासाहेबांचे भाषण.

No comments:

Post a Comment

हिंदु कोड बिल: लव यु बाबासाहेब!

  यु बाबासाहेब " बाबासाहेब दिल्लीवरून नेहरूंची तार आली आहे ते म्हणतायेत की, हिंदू कोड बिल ला देशात सर्वत्र विरोध सुरू आहे. त्यामुळे हे...