Hot Posts

6/recent/ticker-posts

२६ जानेवारी: देशाला संविधान बहाल केलेल्या दिनीच सत्यनारायणाची पुजा का ?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांचे राज्य संपुष्टात येऊन आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर देशातील थोर नेत्यांनी भारताचा एकसंघ असा कायदा किंवा संविधान निर्माण करण्याच्या कार्याला सुरुवात केली. 


संविधान निर्मितीचे महान कार्य करण्यासाठी घटना समिती निर्माण करण्यात आली. त्यामधील काही सदस्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे आणि काही अप्ररिहार्य कारणामुळे संविधान निर्मितीचे मोलाचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवस रात्र एक करून २ वर्ष ११ महिने १८ दिवसात संविधान निर्मितीचे काम पूर्ण केले. भारत देशातील विविध जाती, धर्म पंथातील लोकांना एकसंघ ठेवण्याचे कार्य राज्य घटनेच्या माध्यमातून होते आहे . 

भारताचे संविधान सर्वाना समान संधी मिळवुन देत आहे.  तळागाळातील व्यक्तींसह श्रीमंत लोकांनाही समान न्याय देण्याचे काम संविधान ने केले आहे. महिलांचा सम्मान, जाती निर्मूलन, मूलभूत अधिकार, नागरिकता, एक मताचा अधिकार असे अनेक हक्क आपसर्वाना संविधानानेच दिले.  

असे असले तरी काही लोक संविधान विरोधी कृत्य करत आहेत. ह्या देशाला २६ जानेवारी १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना बहाल केली, डॉ. राजेंद्र प्रसाद तत्कालीन राष्ट्रपती यांना नवनिर्माण केलेले संविधान सुपूर्द केले हाच तो दिवस. आणि ठीक १ वर्षानंतर राज्यघटना कार्यान्वित होऊन समस्त भारत देशाचा कारभार संविधाना नुसार चालु झाला. ह्या दिवसाला २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन असे संबोधण्यात आले. 

तर ह्या दिवसाचे अनन्यसाधारण महत्व आहे. असे असतानाही काही सुजाण नागरिक ध्वजारोहण करत असताना प्रजासत्ताक दिनाचा बाबासाहेब आंबेडकर घटना सुपूर्द करीत असतनाचा फोटो न ठेवता त्या जागी दुसरेच फोटो ठेवण्याचे कट कारस्थान करित आहेत. 

कुणी ह्याच दिवशी सातत्यनारायण पूजन करताहेत. तसे पाहता संविधानानेच सर्वाना आपापला धर्म पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. पण त्यात्या दिनाचे महत्व जाणुन ते आधी केलेच पाहिजे हे ही तेवढेच खरे आणि हितावह आहे. आपल्या देवतांचे पूजन भजन करायला इतर दिवस आहेतच ना.. 

आपण ह्याचा विचार कराल हिच अपेक्षा !

Post a Comment

0 Comments