Tuesday, July 13, 2021

*बौध्द धम्माचे अधिष्ठान*


*1) भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी जीवनमार्ग शोधून काढला.*

*2) भगवान बुद्धांनी प्रतिपादन केलेला जीवनमार्ग यालाच बौध्द-धम्म म्हणतात.*
*3) हा जीवनमार्ग तीन बाबींवर अधिष्ठित आहे.-*
*1) अनित्य 2) दुःख 3) अनात्म.*
*4) यापैकी पहिले अधिष्ठान "अनित्य " आहे.भगवान बुध्द म्हणतात,मनुष्यप्राणी आणि प्रत्येक वस्तु ही परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे.आपल्या जीवनाच्या कोणत्याही क्षणी तो तोच असू शकत नाही.*
*5) याचा अर्थ मनुष्यप्राण्याला दुःख असले तरी त्याच्या दुःखाचे परिमार्जन करता येते.दुःख नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हे धम्माचे पाहिले अधिष्ठान आहे.*
*6) दुःख:- यापैकी दुसरे अधिष्ठान " दुःख " आहे.मनुष्यप्राणी दुःखात, दैन्यात, दारिद्र्यात राहत आहे,हे त्याचे दुसरे तत्व होय.*
*7) सर्व जग दुःखाने भरलेले आहे,याचा अर्थ दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हे धम्माचे दुसरे अधिष्ठान आहे.*
*8) अनात्म :- यापैकी तिसरे अधिष्ठान " अनात्म " आहे.भगवान बुध्द म्हणतात की, आपला जो मार्ग आहे त्याचा ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही संबंध नाही.त्याचा मरणोत्तर जीवन व कर्मकांडाशी संबंध नाही.*
*9) माणुस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हाच धम्माचा केंद्रबिंदू आहे.भगवान बुद्धांनी सांगितलेले हे धम्माचे तिसरे अधिष्ठान आहे.*
*10) अश्याप्रकारे भगवान बुद्धांचा धम्म अनित्य,दुःख आणि अनात्म या तीन बाबींवर अधिष्ठित आहे.*
*11) अनित्य म्हणजे जग हे परिवर्तनशील आहे.दुःख म्हणजे प्रपंच दुःखमय आहे आणि अनात्म म्हणजे जगामध्ये " आत्मा " नावाची काही बाब नाही, जग हे कर्मानुसार चालते, अश्या यथार्थ ज्ञानाला ' सम्यक दृष्टी ' असे म्हणतात.एकंदरीत जगातील दुःख आणि त्यापासुन मुक्तता करण्याचा उपाय हा धम्माचा मुख्य पाया आहे.
!जयभीम! !!जयभारत!! !!!नमोबुद्धाय!!!

No comments:

Post a Comment

हिंदु कोड बिल: लव यु बाबासाहेब!

  यु बाबासाहेब " बाबासाहेब दिल्लीवरून नेहरूंची तार आली आहे ते म्हणतायेत की, हिंदू कोड बिल ला देशात सर्वत्र विरोध सुरू आहे. त्यामुळे हे...