Tuesday, July 13, 2021

सगळ्याचं हित करा .




♀ एका दिवशी एक व्यक्ती भगवान बुद्धाकडे गेला. तो खूप तणावाखाली होता. त्याच्या डोक्यात अनेक प्रश्नांचे काहूर माजले होते.
♀जसे आत्मा म्हणजे काय?, मृत्यूनंतर माणूस कुठे जातो?, सृष्टीची रचना कोणी केली?, स्वर्ग-नरकाचं सत्य नेमकं काय? आणि ईश्वर आहे की नाही? त्याला या प्रश्नांची उत्तर मिळत नव्हती.
♀जेव्हा तो भगवान बुद्धांकडे पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की, अनेक जण त्यांच्या आसपास बसले आहेत. भगवान बुद्ध त्या सगळ्यांच्या प्रश्नांचे समाधान अत्यंत सहजतेने करत आहेत.
♀खूप वेळ हा उपक्रम सुरू होता. बुद्ध सगळ्यांना संतुष्ट करत होते.
♀त्याने विचार केला की, भगवान बुद्धांना दुनियादारीच्या प्रकरणात पडून काय फायदा आहे? त्यांनी भजन करावे आणि साधारण समस्या असणाऱ्या लोकांना दूर करावे.
♀पण भगवान बुद्धांना पाहून तर असे वाटत होते की, त्या लोकांचे दुःख जणू भगवान बुद्धांचेच दुःख आहे. शेवटी त्या व्यक्तीने प्रश्न विचारलाच की, भगवान तुम्हाला संसाराच्या गोष्टींबाबत काय देणंघेणं?
♀तेव्हा बुद्ध म्हणाले की, मी ज्ञानीच नाही तर मी एक माणूसही आहे. "तसंही ज्ञान काय कामाचं, जेव्हा तो माणूस दुसऱ्यांच्या चिंतेला आपली मानू शकणार नाही. असं ज्ञान तर अज्ञानापेक्षाही वाईट आहे."
बुद्धाचे विचार ऐकून आलेल्या व्यक्तीच्या मनातील शंका कुशंका दूर झाली. त्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला मिळाली .आणि तो भगवान बुद्धांचा उपासक झाला.व त्याला जे ज्ञान भगवान बुद्धांकडून मिळाले ते ज्ञान इतरांना देऊ लागला.
☝️ कथेचं सार हे आहे की, ज्ञान हे तेव्हाच सार्थकी लागतं, जेव्हा ते लोकांच्या कल्याणाशी संलग्न होतं.
!जयभीम! !!जयभारत!! !!!नमोबुद्धाय!!!

No comments:

Post a Comment

हिंदु कोड बिल: लव यु बाबासाहेब!

  यु बाबासाहेब " बाबासाहेब दिल्लीवरून नेहरूंची तार आली आहे ते म्हणतायेत की, हिंदू कोड बिल ला देशात सर्वत्र विरोध सुरू आहे. त्यामुळे हे...